मनमाड येथे रविवारी खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धा 

  • By admin
  • August 5, 2025
  • 0
  • 133 Views
Spread the love

मनमाड (जि. नाशिक) ः भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन मनमाड येथे रविवारी (१० ऑगस्ट) जय भवानी व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ता शिंपी, सचिव प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर, जय भवानी व्यायामशाळेचे मोहनअण्णा गायकवाड, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केले आहे.

अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धा रविवारी सकाळी ९ वाजता सुरू होणार असून आठ वजनी गटात स्पर्धक सहभागी होवू शकतात. ४४ किलो, ४८ किलो, ५३ किलो, ५८ किलो, ६३ किलो, ६९ किलो, ७७ किलो व ७७ किलोवरील
सर्व वजनी गटातील विजयी खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येईल. तसेच सहभागी सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जातील.

या स्पर्धेचे उद्घाटन समृद्धी सहकारी बँकेच्या चेअरमन अंजुमताई सुहास कांदे,  सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे व छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोतदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *