
नवी दिल्ली ः भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल दुलीप ट्रॉफीमध्ये उत्तर विभागीय संघाचे नेतृत्व करणार आहे. अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.
शुभमन गिल, अर्शदीप सिंग, हर्षित राणा हे तिघेही २८ ऑगस्टपासून पूर्व विभागाविरुद्ध सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या क्वार्टर फायनल सामन्यात खेळताना दिसतील. आशिया कप ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. जर तिन्ही खेळाडू भारतीय संघात निवडले गेले तर त्यांना उत्तर विभागीय संघातून वगळण्यात येईल.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघाने अलीकडेच इंग्लंड संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली. २-२ अशी बरोबरीत संपलेल्या या मालिकेत, या तरुण फलंदाजाने चमकदार कामगिरी केली आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. आता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवण्यास सज्ज आहे. जर गिलची आशिया कपसाठी भारतीय संघात निवड झाली तर शुभम रोहिल्ला त्याची जागा घेईल. त्याचवेळी अर्शदीप सिंगच्या जागी गुरनूर ब्रारला संधी मिळेल तर हर्षित राणाच्या जागी अनुज ठकराल खेळतील.
दुलीप ट्रॉफीसाठी उत्तर विभागाचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), शुभम खजुरिया, अंकित कुमार (उपकर्णधार), आयुष बदोनी, यश धुल, अंकित कलसी, निशांत सिंधू, साहिल लोत्रा, मयंक डागर, युधवीर सिंग चरक, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अन्शुल कम्बोज
राखीव खेळाडू: शुभम अरोरा, जसकरणवीर सिंग पॉल, रवी चौहान, आबिद मुश्ताक, निशंक बिर्ला, उमर नझीर, दिवेश शर्मा.