
हर्ष दुबे, यश राठोड, आदित्य ठाकरे, दानिश मालेवार यांचा समावेश
नागपूर ः आगामी दुलीप ट्रॉफीमध्ये मध्य विभागाच्या १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचा ध्रुव जुरेल करणार आहे. जुरेलने गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे कसोटी पदार्पण केले. या संघात विदर्भाचे ४ खेळाडू हर्ष दुबे, यश राठोड, आदित्य ठाकरे आणि दानिश मालेवार यांचा समावेश आहे.

विदर्भाचे रणजी ट्रॉफी विजेते प्रशिक्षक उस्मान घनी यांना संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हर्ष दुबे हा रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता तर यश राठोड आणि दानिश मालेवार हे चॅम्पियन विदर्भ संघासाठी प्रमुख धावा काढणारे फलंदाज होते. विदर्भाचा आणखी एक खेळाडू – वेगवान गोलंदाज यश ठाकूर याला गुरुवारी इंदूरमध्ये झालेल्या संघ निवड समितीने स्टँडबाय म्हणून निवडले आहे.

मध्य विभाग संघ
ध्रुव जुरेल (कर्णधार), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, आयुष पांडे, दानिश मालेवार, शुभम शर्मा, संचित देसाई, यश राठोड, कुलदीप यादव, हर्ष दुबे, आदित्य ठाकरे, मानव सुथार, दीपक चहर, खलील अहमद, सारांश जैन.
राखीव खेळाडू ः महिपाल लोमरोर, यश ठाकूर, माधव कौशिक, कुलदीप सेन, युवराज चौधरी, उपेंद्र यादव.
सहाय्यक कर्मचारी
प्रशिक्षक उस्मान घनी, सहायक प्रशिक्षक विनित सक्सेना, फिजिओ फरीद अहमद, एस अँड सी प्रशिक्षक मयंक अग्रवाल, परफॉर्मन्स अॅनालिस्ट अमित माणिकराव, व्यवस्थापक नवनीत मिश्रा.