
कल्याण ः एसआयडब्ल्यूएस शाळा वडाळा, मुंबई येथे संपन्न झालेल्या १२ व्या जिल्हा स्तरीय बुडो मार्शल आर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा तसेच टैंग सु-डो चॅम्पियनशिप स्पर्धेत कल्याण ईस्ट येथील यशस्वी कराटे क्लासच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावत पाच सुवर्ण व चार रौप्य अशी नऊ पदकांची कमाई केली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय शहा हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड प्रवीण रहाटे तसेच संतोष कुमार मिश्रा हे उपस्थित होते. यशस्वी कराटे क्लासेस मधून कराटे स्पर्धेमध्ये भाग घेऊन यशस्वी कराटे क्लास कल्याण ईस्ट संघाने तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवली.
या स्पर्धेत कराटे फाईट शैली या प्रकारता अनुक्षा तावडे (सुवर्णपदक), विराट शिंदे (सुवर्णपदक), सई मोरे (रौप्य पदक), श्रद्धा जगजापे (रौप्य पदक) यांनी पदके जिंकली. काता शैली प्रकारात यशस्वी रहाटे (सुवर्णपदक), अपर्णा मडवी (रौप्य पदक), स्वरा केदारे (सुवर्णपदक), देवांशी पाटील (रौप्य पदक), विजेता रहाटे (सुवर्णपदक), ब्रेकिंग स्टाईल – विराट शिंदे (कांस्यपदक) यांनी पदकांची कमाई केली.
अजय शहा व त्यांच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करुन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजयी झालेल्या सर्व खेळाडू आणि संघाचे अभिनंदन करण्यात आले.