
दिंडोरी ः टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित १७ वर्षांखालील टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक येथे उत्सवात स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये बालभारती पब्लिक स्कूल दिंडोरी या संघाने तृतीय क्रमांक मिळवला.
जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विलास गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड, सहसचिव धनंजय लोखंडे, क्रीडा शिक्षक मुकेश सोनवणे, राहुल परदेशी, संदीप बोरसे, अनिता गणोरे, प्रशांत आढाव, विजय घोटेकर आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी बालभारती पब्लिक स्कूलचे खेळाडू सिद्धांत राहुल गांगुर्डे, निखिल जोतमल चव्हाण, सर्वेज्ञ अनिल मेधने, आदित्य विलास मुळाने, साई संजय देशमुख, प्रथमेश गणेश देशमुख यांची सोलापूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. या कामगिरीबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रीतम प्रकाशराव देशमुख, सुयोग सुभाष धोंगडे (उपाध्यक्ष), विलास एकनाथ देशमुख (खजिनदार), संदीप बाळकृष्ण शेटे (सचिव) यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक अनिता गणोरे, संदीप बोरसे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.