नंदुरबार ः ऑल नंदुरबार जिल्हा फुटसाल असोसिएशनतर्फे १० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय फुटसाल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात १० ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता निवड चाचणीस सुरुवात होईल. या निवड चाचणीतून १३ राज्यस्तरीय ज्युनिअर फुटसाल अजिंक्यपद स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघाची निवड करण्यात येईल. या स्पर्धेत १४ वर्षांखालील तसेच १८ वर्षांखालील मुले आणि मुली सहभाग घेऊ शकतात. या स्पर्धेत जास्तीतजास्त फुटसाल खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा फुटसाल असोसिएशन अध्यक्ष राजेश परदेशी यांनी केले आहे अधिक माहितीसाठी जिल्हा फुटसाल असोसिएशन सचिव रामा हटकर (9766537982), आयोजक तुषार सोपनर (9850311442) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.