
रिषभ कपूर, रित्वी त्रिभुवनची कर्णधारपदी निवड
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा बास्केटबॉल जाहीर करण्यात आला असून मुलांच्या संघाचा कर्णधार रिषभ कपूर आणि मुलींच्या संघाच्या कर्णधारपदी रित्वी त्रिभुवन हिची निवड करण्यात आली आहे.
पुणे बालेवाडी क्रीडा संकुल येथे ९ ते १४ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनच्या वतीने १८ वर्षांखालील मुला आणि मुलींसाठी ७५ व्या कनिष्ठ वयोगटांच्या आंतर-जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघांची जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव मंजितसिंग दारोगा आणि जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव गणेश कड यांनी विभागीय क्रीडा संकुल येथे बास्केटबॉल संघ जाहीर केला.
निवड झालेल्या संघास जिल्हा व तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव मंजितसिंग दारोगा आणि जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव गणेश कड, चॅम्पियन्स क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संजय डोंगरे, प्रशांत बुरांडे, संदीप ढंगारे, सौरभ ढीपके, तनुश्री चव्हाण आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.
मुलांचा संघ
रिषभ कपूर (कर्णधार), आदित्य खांडेकर, सोहम कोल्हे, जय निकम, राज मालकर, युवराज करवा, पार्थ देवळाणकर, आर्य शिरसाठ, विश्वप्रताप राजपूत, विनायक निकम, राजवीर मुनोत, अथर्व नाईक. संघ प्रशिक्षक रौनक सिंग, सहायक प्रशिक्षक शुभम गवळी.
मुलींचा संघ
रित्वी त्रिभुवन (कर्णधार), मोहिशा खांडे, मनिका सोदी, कृष्णा गायकवाड, गार्गी पाटील, राधिका गवळी, आक्रिती बाहेती, केतकी ढंगारे, कनिष्का गायकवाड, सुरमयी भागवत, सानिका तिदार, परिशी जैन. संघ प्रशिक्षक विपुल कड, सहायक प्रशिक्षक अजय सोनवणे.