छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने सब ज्युनियर जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेचे १० ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता एन ३ सिडको येथील संघटनेच्या ज्युदो हॉलवर आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतून निवडलेला संघ २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान लातूर येथे होणाऱ्या ५२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर गटाच्या राज्य ज्युदो आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधीत्व करेल. इच्छुक खेळाडूंनी जन्म दाखला, आधार कार्ड व शाळेने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. स्पर्धा संचालक म्हणून प्रसन्न पटवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवड चाचणीत जास्तीत जास्त मुला-मुलींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे व सचिव अतुल बामणोदकर यांनी केले. खेळाडूंनी अधिक माहिती साठी संघटनेचे तांत्रिक समितीचे सचिव अमित साकला (९६७३००१२४१) यांच्याशी संपर्क साधावा.