
राजमहेंद्र येमूल सुवर्ण व कांस्य तर विष्णू सरगर कांस्यचे मानकरी
सोलापूर ः कोझिकोड (केरळ) येथे झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडूंनी एक सुवर्ण व दोन कास्य पदकांची कमाई केली.
राजमहेंद्र येमूल यांनी वयाच्या ६३व्या वर्षी मास्टर तीन गटातील ८३ किलो गटात ३९२.५ किलो वजन उचलून कांस्य तर बेंच प्रेस या प्रकारात १०२.५ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. सांगोल्यातील विष्णू सरगर यांनी वयाच्या ७३व्या वर्षी मास्टर फोर या गटात ९४ किलो वजन गटात बेंच प्रेस या प्रकारात ६५ किलो वजन उचलत कांस्य पदक प्राप्त केले.
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ सुरेश पवार, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य सचिन गायकवाड, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा संतोष गवळी, प्रा पवार, प्रा गायकवाड (सांगोला), मारुती घोडके, नितीन गोरे, विलास बेलदार व शुभम जगताप यांनी अभिनंदन केले.