
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्याचे क्रीडा धोरण, विविध क्रीडा स्पर्धा व क्रीडा विषयक उपक्रम जिल्ह्यात यशस्वी राबविण्याबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हातील सर्व एक विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सहविचार बैठक विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केली होती. या बैठकीत क्रीडा संघटकांनी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांचा सत्कार केला.
या बैठकीचे औचित्य साधून जिल्हा मैदानी, कुस्ती तसेच सॉफ्टबॉल संघटनेच्या वतीने डॉ फुलचंद सलामपुरे यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित एकनाथ साळुंखे, टेबल टेनिस संघटनेचे मंजित सिंग दरोगा, मैदानी खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच डॉ. दयानंद कांबळे, योग संघटनेचे सुरेश मिरकर, तसेच इतर विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.