
छत्रपती संभाजीनगर ः स्विमिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय पंच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महानगरपालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलाव येथे करण्यात आले होते.
या शिबिरास जिल्ह्यातील खेळाडू, पंच, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत जलतरणातील तंत्रशुद्ध पंच कार्यपद्धती अनुभवली. स्पर्धेदरम्यान शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध पद्धतीने पंचांचे काम पार पडावे व निःपक्षपाती निर्णायक निवड व्हावी या अनेक पैलूवर पंच व प्रशिक्षक यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबीर ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अभय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
प्रशिक्षणार्थींना साईचे राष्ट्रीय पंच प्रशिक्षक सुमित दुबे व डॉ जी सूर्यकांत यांचे प्रशिक्षण लाभले. या शिबिरात अजय दाभाडे, निखिल पवार, अंजुषा मगर, अश्विनी मार्कंडे, दीपक साठे, नीता पाटील, शिरीष यादव, गणेश आहेवाड, गणेश बारवाल, करण सोने, दीपक ठाकरे, वैशाली जैन, सिद्धी काळे, अमरदीप कांबळे, सोहम खांडेभराड, पद्मा धारवडकर, दीप्ती सोनवणे, प्रतीक काकडे, प्राजक्ता जोशी, राशीद सय्यद, विजय पाटील, नेहा साळवे, तेजस जाधव, विशाल गायकवाड, आदित्य टाक यांनी सहभाग नोंदविला.
सहभागी प्रशिक्षणार्थींना यशस्वीतेबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रुस्तुम तुपे, मनपा वार्ड अधिकारी रमेश मोरे, कर्मवीर लव्हेरा, किरण टाकळकर आदींनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.