 
            नवी दिल्ली ः आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या रमेश बुधियालने पुरुषांच्या खुल्या गटात कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे, तो या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.
शनिवारी या स्पर्धेच्या पदक फेरीत पोहोचणारा बुधियाल पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्याने अंतिम फेरीत १२.६० गुणांसह कांस्यपदक जिंकले. कोरियाच्या कानोआ हीजेने १५.१७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर इंडोनेशियाच्या पजार एरियानाने १४.५७ गुणांसह रौप्यपदक जिंकले.
महिलांच्या खुल्या गटात, जपानच्या अनरी मात्सुनोने (१४.९० गुण) आपल्याच देशबांधव सुमोमो सातो (१३.७०) यांच्या कठीण आव्हानावर मात करून सुवर्णपदक जिंकले. थायलंडच्या इसाबेल हिग्जने ११.७६ गुणांसह कांस्यपदक जिंकले. कोरियाच्या कानोआ हीजेने १८ वर्षांखालील मुलांच्या गटात १४.३३ गुणांसह सुवर्णपदक जिंकून दुहेरी यश मिळवले. चीनच्या शिदोंग वू (१३.१०) आणि शुलो जियांग (८) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
मुलींच्या १८ वर्षांखालील गटात चीनच्या सिकी यांगने १४.५० गुणांसह सुवर्णपदक जिंकले आणि तिचीच देशबांधव शुहान जिन (१०.३३) ने रौप्यपदक जिंकले. थायलंडच्या इसाबेलने (८.१० गुण) कांस्यपदक जिंकले.



