 
            मुंबई ः सनी निम्हण यांच्या पुढाकाराने सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित गोविंदा गार्डन मंगल कार्यालय पुणे येथे सुरू असलेल्या विनायक निम्हण स्मृती दुसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत झैद अहमद, प्रशांत मोरे, समृद्धी घाडीगावकर यांनी आगेकूच कायम ठेवली आहे.
पुरुष एकेरी गटात उप उपांत्य फेरीत ठाण्याच्या झैद अहमदने विश्वविजेत्या जळगावच्या संदीप दिवेचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात ११-२२, २५-४, २५-१६ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर दुसरीकडे माजी विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेने पहिल्या सेटमध्ये आठव्या बोर्डात व्हाईट स्लॅमची नोंद करत मुंबईच्याच सिद्धांत वाडवलकरचा २२-१०, २२-१० असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवत आगेकूच केली. महिलांच्या उप उपांत्य सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुबईच्या उर्मिला शेंडगेचा तीन सेटमध्ये २५-६, १९-२१, २५-१९ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
महत्त्वाचे निकाल
रियाझ अकबरला अली (रत्नागिरी) विजयी विरुद्ध समीर अंसारी (ठाणे), विकास धारिया (मुंबई) विजयी विरुद्ध ओमकार नेटके (मुंबई), प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) विजयी विरुद्ध पुष्कर्णी भट्टड (पुणे), सोनाली कुमारी (मुंबई) विजयी विरुद्ध नीलम घोडके (मुंबई), केशर निर्गुण (सिंधुदुर्ग) विजयी विरुद्ध आकांक्षा कदम (रत्नागिरी).



