
सोलापूर ः व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये खेळाडूंचा रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका जी एच कल्याणी, उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर, पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमणी पेगडा आदी उपस्थित होते. इयत्ता नववी व दहावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना व क्रीडा शिक्षकांना राखी बांधली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या बहिणींना चॉकलेट व जिलेबी व गिफ्ट देऊन सर्वांचे आभार मानले. यावेळेस क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील व मोनिका जाधव व सहशिक्षक भगतलाल सुतार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी, सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.