
नागपूर ः बँकर्स स्पोर्ट्स कौन्सिल, नागपूर आणि आरवायएमसीए यांनी संयुक्तपणे रविवारी सिव्हिल लाईन्स येथील आरवायएमसीए सभागृहात आंतर-बँक अंताक्षरी स्पर्धा आयोजित केली होती. नागपूर शहरातील १० वेगवेगळ्या बँकांच्या स्पर्धकांनी अंताक्षरी स्पर्धेत भाग घेतला.
या स्पर्धेत युनियन बँक संघ विजेता ठरला. स्मिता ठाकरे, दर्शना वानखेडे यांनी घवघवीत यश संपादन केले. उपविजेता संघ युनियन बँक ठरला. या संघात दीपिका तांबडे, नीलिमा रामटेके यांचा समावेश होता.
या स्पर्धेदरम्यान वायएमसीए सचिव नीरज सिंग, बँकर्सचे अध्यक्ष रमेश ठाकूर, उपाध्यक्ष प्रफुल्ल नांदेडकर, सचिव रवी जोशी उपस्थित होते. संघटन सचिव चंदू मानके, अश्विन अंजनकर, राहुल देशपांडे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिभुवन मेश्राम यांनी केले आणि मुलाखतकार मंगेश पुराणिक होते. शिरीष पांडे हे हार्मोनियमवर आणि शैलेश देवघरे हे तबल्यावर संगीतकार होते आणि माइक अरेंजमेंट बबलू उमरेडकर यांनी केले होते.