
मंगळवेढेच्या दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयाकडे स्पर्धेचे यजमानपद
सोलापूर ः पंढरपूर येथील स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनियरींग येथे १८ ते २० ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा हंगामास सुरवात होईल.
या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान दलितमित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय मंगळवेढा या महाविद्यालयास मिळाला आहे. २०२५ हे शिक्षण प्रसारक मंगळवेढा या संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष असून याच वर्षी यजमान पदाचा मान मिळाल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. महाविद्यालयात क्रीडा परिषदेच्या बैठकीत यंदाच्या वर्षातील ३२ खेळांच्या स्पर्धेचे स्थळ व कालावधी निश्चित करण्यात आला अससल्याचे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक तथा स्पर्धा सचिव विशाल होनमाने यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ अतुल लकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र गायकवाड, माऊली कॉलेजचे प्राचार्य डॉ शिरीष भोसले, गणपतराव देशमुख विज्ञान महाविद्यालय सांगोलाचे प्राचार्य डॉ मुलाणी, सांगोला महाविद्यालयाचे डॉ सुरेश भोसले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
या बैठकीस संस्थेचे अध्यक्ष ॲड सुजित कदम व संचालिका प्रा तेजस्विनी कदम, उपाध्यक्ष डॉ सुभाष कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचे वेळापत्रक (खेळ प्रकार, स्पर्धा कालावधी व आयोजक महाविद्यालय )
बुद्धिबळ (१८ ते २० ऑगस्ट, स्वेरी अभियांत्रिकी पंढरपूर), लॉन टेनिस (२३ ऑगस्ट, दयानंद वेलणकर वाणिज्य), बॅडमिंटन (२५, २६ ऑगस्ट, शिवाजी बार्शी), धनुर्विद्या (३० ऑगस्ट, सुवर्णलता गांधी वैराग), बास्केटबॉल (३ व ४ सप्टेंबर, सांगोला महाविद्यालय), कबड्डी (९ ते ११ सप्टेंबर, दलितमित्र कदम गुरुजी मंगळवेढा), ज्युदो (१२, १३ सप्टेंबर, शिवाजी रात्र महविद्यालय), व्हॉलिबॉल (१६ ते १८ सप्टेंबर, माढा महाविद्यालय), क्रॉसकंट्री (२० सप्टेंबर, दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालय कोळे), खो-खो (२३ ते २५ सप्टेंबर, दलित मित्र कदम गुरुजी मंगळवेढा), टेबल टेनिस (२९, ३० सप्टेंबर, शिक्षणशास्त्र बार्शी), क्रिकेट (१ ऑक्टोबरपासून, केबीपी पंढरपूर), बॉक्सिंग (३, ४ ऑक्टोबर, बाबुराव पाटील अनगर), जलतरण (७, ८ ऑक्टोबर), कुस्ती (१०, ११ ऑक्टोबर, दोन्ही दलित मित्र कदम गुरूजी मंगळवेढा), ॲथलेटिक्स (१३ ते १५ ऑक्टोबर, डीबीएफ दयानद कला व शास्त्र), फुटबॉल (११ ते १३ नोव्हेंबर, हिराचंद नेमचंद वाणिज्य), मल्लखांब (१५ नोव्हेंबर, के एन भिसे कुर्डुवाडी), तलवारबाजी (१७ नोव्हेंबर, संगमेश्वर रात्र), शरीरसौष्ठव व वेटलिफ्टिंग (१९, २० नोव्हेंबर, शंकरराव मोहिते अकलूज), हॉकी (२४, २५ नोव्हेंबर, सोशल), तायक्वोंदो (२८, २९ नोव्हेंबर, उमा पंढरपूर), पॉवरलिप्टींग (२ डिसेंबर, शिवाजी रात्र), रायफल व पिस्तूल शूटींग (४ डिसेंबर, व्ही जी शिवदारे), गतका (८ डिसेंबर, महाडीक मोडनिंब), हँडबॉल (१०, ११ डिसेंबर), कराटे (१६ डिसेंबर), योगा (१९ डिसेंबर), बेसबॉल (२३, २४ डिसेंबर), सॉफ्टबॉल (९, १० जानेवारी), टेनिस व्हॉलिबॉल (१६ जानेवारी), शुटींग व्हॉलिबॉल (२१ जानेवारी), सर्व दलित मित्र कदम गुरुजी मंगळवेढा).