
ठाणे ः केरळ मधील कोझीकोडे येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेत ठाण्याचे बुजुर्ग आंतरराष्ट्रीय लिफ्टर सतीश पाताडे यांनी शानदार कामगिरी करत दोन सुवर्ण, एक रौप्यपदक पटकावले.
चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ या खेळाशी त्यांचा संबंध असून आतापर्यंत अनेक जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पाताडे यांनी शंभर पेक्षा जास्त पदकांची कमाई केली आहे. ते राष्ट्रीय पंच देखील असून नुकत्याच झालेल्या रेफरी कैटिगरी वन परीक्षेत देखील त्यांनी यश संपादन केले. ते स्वतःहा चांगले धावपटू असून त्यांचा एस एम एस पाताडे फिटनेस क्लब देखील आहे. क्लबच्या माध्यमातून ते धावपटूंना प्रशिक्षण देखील देतात. मास्टर्स स्पर्धेतील त्यांच्या यशाबदल राज्य पॉवर लिफ्टिंग संघटनेचे सरचिटणीस संजय सरदेसार्ई यांनी पाताडे यांचे खास अभिनंदन केले आहे.