धुळे ः महाराष्ट्र राज्य ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी धुळे शहरातील वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने १६ व १७ ॲागस्ट रोजी सकाळी ७ वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीत विद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ही निवड चाचणी स्पर्धा १४, १६, १८, २० आणि २३ वर्षांखालील गटात होणार आहे. या चाचणीत १००, २००, ४००, ८००, १५००, ५०००, १०००० मीटर धावणे, ३००० मीटर स्टीपल चेस धावणे, लांब उडी, गोळा फेक, उंच उडी, भाला फेक, थाळी फेक, हातोडा फेक अशा विविध प्रकारांत खेळाडूंना सहभाग घेता येईल.
निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी अॅथलेटिक्स फेडरेशन इंडियाचे यूआयडी कार्ड सोबत आणावे आणि जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबंडे व सचिव प्रा नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष हेमंत भदाणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रशिक्षक प्रमोद पाटील (७४९८४६८६६२), अमोल पाटील, शिंदखेडा तालुका (७७७६८११४८८), सुभाष पावारा, शिरपूर तालुका (९८९०२९२२३०), धनजंय सोनावणे, साक्री तालुका (९९७०६०८०९०), सुखदेव महाले, धुळे तालुका (९५७९४२३७१०) यांच्याशी संपर्क साधावा.



