चॅलेंजर स्पोर्ट्स फाऊंडेशनचा उपक्रम
सोलापूर ः सोलापूर अल्ट्रा आझादी रन १४ व १५ ऑगस्टला आयोजित केली आहे. स्वातंत्रदिनानिमित्त चॅलेंजर स्पोर्ट्स फाऊंडेशनचा ‘रन फॉर नेशन’ हा सलग ७८ किलोमीटर रनिंगचा अनोखा उपक्रम सलग चौथ्या वर्षी होत आहे.
देशाला मानवंदना देण्याचा, देश प्रेम आणि फिटनेसबद्दल महत्व वाढवणे हा या रनमागचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी महाराष्ट्रातून निरनिराळ्या भागातून रनर येणार असल्याचे संयोजक अतिश शहा यांनी सांगितले.
३ किमी ते ७८ किमीपर्यंत अशा ८ प्रकारात हा रनिंगचा उपक्रम आहे. १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सिद्धेश्वर वनविहार परिसरातील पोदार स्कूल जवळून याची सुरुवात होईल. पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि मोनिका सिंघ यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता या उपक्रमाचा समारोप तेथेच होईल. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.



