
परभणी (गणेश माळवे) ः स्वांतत्र्य दिनाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
तिरंगा सायकल रॅलीची अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथुन सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, विसावा कॉर्नर मार्ग गांधी पार्क, शिवाजी चौक येथून जनता मार्केट, ग्रॅन्ड कॉर्नर वरुन महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल येथे सायकल रॅलीची सांगता विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करुन करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक वामन बेले, मुख्याध्यपक गांधी विद्यालय पी आर जाधव, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर, क्रीडा अधिकारी रोहन औढेंकर, अब्दुल मुजीब खान, मोहम्मद लैखोदिन अन्सारी, मंगेश इंगळे, यमनाजी भारशंकर, कृष्णा शिंदे, जी डी आव्हाड यांची उपस्थिती होती.
या तिरंगा रॅली करीता गांधी विद्यालय, एकता नगर, भारतीय बाल विद्यामंदीर, डॉ जाकेर हुसेन विद्यालय, खो-खो प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते. रॅलीमध्ये देशभक्ती गीत गात, देश भक्तीपर घोषणा देवून तिरंगा सायकल रॅली उत्साहात संपन्न झाली. तिरंगा रॅली यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील धीरज नाईकवाडे, योगेश आदमे, भागवत दुधारे, प्रकाश पंडित यांनी परिश्रम घेतले.