
सासवड ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय सासवड येथे सुरू असलेल्या महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्या टेबल टेनिस स्पर्धेत प्रा मनिषा जगदाळे यांनी विजेतेपद पटकावले.
प्राध्यापक महिला गटाच्या अंतिम सामन्यात प्रा पूनम काळे यांचा ११-०६ , ११-०२ असा सरळ दोन सेट मध्ये दणदणीत पराभव करीत वाघिरे महाविद्यालय आयोजित टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या प्राध्यापक महिला गटाच्या करंडकावर मनिषा जगदाळे यांनी आपले नाव कोरले. तसेच तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात प्रा मानसी जोशी यांनी प्रा सुप्रिया राणे यांचा ११-०८, ११-०८ असा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला.
तत्पूर्वी झालेल्या सामन्यात पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये पूनम काळे यांनी मानसी जोशी यांचा ११-०९, ०९-११ व ११-०४ असा २-१ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मनिषा जगदाळे यांनी सुप्रिया राणे यांना ११-०४ व ११-०९ अशा गुण फरकाने २-० सेटने पराभूत केले. वाघिरे महाविद्यालय आयोजित महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सदर स्पर्धा पुढील पूर्ण सप्ताह सुरू राहणार आहेत.