 
            रावेर ः जळगाव जिल्हा हौशी ज्युदो असोशिएशन यांच्यावतीने सब ज्युनियर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण २५ खेळाडूंनी सहभाग घेत आपले कौशल्य सादर केले.
या स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंची २२ ते २४ ऑगस्ट या कालावधीत लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचे अध्यक्ष नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल पी देशमुख हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी ज्युदो हा ऑलिम्पिक खेळ असून या खेळासाठी सर्वेतोपरी मदत करायला महाविद्यालयाची तयारी आहे आणि जास्तीत जास्त खेळाडूंनी या खेळाकडे वळावे असे प्रतिपादन केले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला विजय वाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ के बी पाटील, एनसीसी लेफ्टनंट शिवराज पाटील, क्रीडा संचालक प्रा सुभाष वानखेडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत पंच म्हणून जळगाव जिल्हा हौशी ज्युदो असोसिएशनचे राज्यस्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण दिगंबर महाजन, तसेच देवेंद्र सूर्यवंशी हे लाभले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र सूर्यवंशी यांनी केले. प्रा सुभाष वानखेडे यांनी आभार मानले.
जळगाव जिल्हा हौशी ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष विष्णूभाऊ भंगाळे, सचिव डॉ उमेश पाटील, प्रा अतुल गोरडे, अजय काशीद, दिगंबर महाजन, देवेद्र सूर्यवंशी, प्रा सुभाष वानखेडे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
विजेते खेळाडू
२८ ते ३२ किलो – भूमी राजेश कुलथे, ३२ ते ३६ किलो – राशी भालचंद्र वाणी, ३६ ते ४० किलो वजन – डिंपल रजनीकांत चौधरी, ४० ते ४४ किलो वजन गट – विधी किरण दवंडे, ५२ ते ५७ किलो वजन गट – भूमिका अरुण मालपाणी, ५७ किलोवरील गट – मनस्वी सागर पाटील.
२५ ते ३० किलो वजन गट – वरद रुपेश सोनवणे, ३० ते ३५ किलो वजन गट – आदित्य अनिल वाणी, ३५ ते ४० किलो वजन गट – प्रतीक गोरख सुरवाडे, ४० ते ४५ किलो वजन गट – मीतेश ललित वाणी, ४५ ते ५० किलो वजन गट – हेमंत संतोष कुंभार.



