
नवी दिल्ली ः दिग्गज टेनिसपटू व्हीनस विल्यम्स लवकरच ‘बार्बी डॉल’च्या रूपात दिसणार आहे. बाहुली उत्पादक कंपनीने त्यांच्या प्रेरणादायी महिलांच्या मालिकेत व्हीनसला दाखवणारी ‘बार्बी डॉल’ बनवली आहे, जी शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे.
२००७ मध्ये विम्बल्डन चॅम्पियन बनताना व्हीनसने जो पोशाख घातला होता तोच पोशाख या बाहुलीने परिधान केला आहे. याच वर्षी पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेत महिलांना पुरुषांइतकीच बक्षीस रक्कम मिळाली होती. या बाहुलीची किरकोळ किंमत ३८ डॉलर असल्याचे सांगितले जाते, ज्यामध्ये व्हीनस पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान करेल. तिच्या गळ्यात हिरव्या रंगाचा रत्नजडित हार, मनगटावर बँड, रॅकेट आणि हातात टेनिस बॉल असेल.