
छत्रपती संभाजीनगर ः उत्तर प्रदेशच्या नोएडा येथे सुरू असलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर शहर बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (साई) छत्रपती संभाजीनगरची बॉक्सिंग खेळाडू ओवी अभिजीत अदवंत हिने ४६-४९ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले.
सुवर्णपदक विजेत्या ओवी अदवंत हिला साई क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक वर्षा त्रिपाठी, पंकज यादव यांचे मार्गदर्शन लाभले असून तिने बॉक्सिंग खेळाची सुरुवात प्रशिक्षक अजय जाधव यांच्या मार्गदर्शनखाली केली होती.
ओवीच्या या कामगिरीबद्दल तिचे छत्रपती संभाजीनगर शहर बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष एकनाथ जाधव, सचिव पंकज भारसाखळे तसेच बॉक्सिंग प्रशिक्षक राहुल टाक यांनी अभिनंदन केले आहे.