< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन पद्धतीने स्थलांतर प्रमाणपत्र – Sport Splus

आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ऑनलाईन पद्धतीने स्थलांतर प्रमाणपत्र

  • By admin
  • August 14, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातून पदवी, पदविका आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणाकरीता इतर विद्यापीठात किंवा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयात प्रवेश घेतात.

या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आतापर्यंत विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत ऑफलाईन पद्धतीने स्थलांतर प्रमाणपत्र अदा करण्यात येत होते. यामध्ये विद्यार्थ्यांचा बऱ्याच वेळ तसेच विद्यापीठाचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होत होता. सदरबाब विचारात घेता विद्यापीठाद्वारे सदर कार्यप्रणालीचे ऑटोमेशन करण्यात आले. त्यानुषंगाने विद्यापीठ स्थापनेपासून म्हणजे सन १९९८-९९ ते २०२३-२४ पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे तयार केलेले स्थलांतर प्रमाणपत्र वितरीत करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले. 

या प्रसंगी कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ऑटोमेशन प्रणालीद्वारे विद्यार्थी लॉगिन तयार करुन त्यामधून आपले स्थलांतर प्रमाणपत्र तयार करण्याकरीता योग्य सोय करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

या स्थलांतर प्रमाणपत्र ऑटोमेशन प्रणाली यशस्वी करण्याकरीता पात्रता  विभागाचे विभाग प्रमुख उपकुलसचिव महेन्द्र कोठावदे, सहाय्यक कुलसचिव नितीन शिंदे, सांख्यिकी अधिकारी प्रवीण घाटेकर आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *