
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील वाणिज्य विभागात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन आणि कार्यशाळा : कंपनी सचिव – करिअर जागरूकता कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर, प्रमुख व्याख्याते म्हणून सीएस महेश दुबे, उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ राजेश लहाने यांनी वाणिज्य विभागात उपलब्ध असलेले विविध कोर्सेस आणि त्यासाठी आवशयक असलेल्या विविध सोयी-सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वाणिज्य कंपनी सेक्रेटरी कोर्सचे महत्व सांगताना त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भारतात आणि भारताबाहेर असलेल्या विविध संधीबद्दल माहिती दिली.
उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते यांनी आपल्या भाषणामध्ये वाणिज्य पदवी सोबतच इतर व्यावसायिक कोर्सेससोबत विद्यार्थ्यांनी आपले करिअर विकसित करता येईल. विद्यार्थ्यानी आपल्या कॉलेज जीवनामध्ये आपल्या वरिष्ठांसोबत अथवा सहकाऱ्यांसोबत कसे वागावे या विषयी मार्गदर्शन केले.
प्रमुख व्याख्याते सीएस महेश दुबे यांनी आपल्या व्याख्यानांमध्ये कंपनी सेक्रेटरी संदर्भातील संधी व कोर्स करता असताना येणाऱ्या अडचणींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कंपनी सेक्रेटरी कोर्सचा कालावधी, अभ्यासक्रम, कोर्स केल्यानंतर कोठे-कोठे संधी उपलब्ध आहेत, याविषयी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला व शेवटी प्रश्नोत्तराने व्याख्यानाचा समारोप केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर हे होते. आपल्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते म्हणाले की, देवगिरी महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक नामांकित महाविद्यालय असून विद्यार्थ्यानी आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध विभाग कार्यरत आहेत., जसे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाट्यशास्त्र विभाग अशा विविध विभागातील संधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. यावेळी वाणिज्य विभागातील २१० विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ भाऊसाहेब शिंदे यांनी केले, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभागप्रमुख डॉ राजेश लहाने यांनी केला. डॉ अविनिश धोत्रे यांनी आभार मानले.