छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा तलवारबाजी संघटनेतर्फे शुक्रवारी (१५ ऑगस्ट) सकाळी दहा वाजता कॅडेट (१७ वर्षाखालील) जिल्हास्तरीय तलवारबाजी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन वसंतराव नाईक महाविद्यालयातील बॅडमिंटन हॉल या ठिकाणी करण्यात आले आहे.
या स्पर्धेतून निवडलेला संघ छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत सहभागी होणार आहे. निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी जन्मतारीख एक जानेवारी २००९ नंतरची असावी. अधिक माहितीसाठी प्रशिक्षक अजय त्रिभुवन, तुषार आहेर, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, शिल्पा नेने, राहुल दणके यांच्याशी संपर्क साधावा.
या निवड चाचणी स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष एस पी जवळकर, डॉ दिनेश वंजारे यांनी केले आहे.