
मुंबई ः कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल (फोर्ट) संघाने बॉईज अंडर १६ डिव्हिजन १ किताब जिंकला. फायनलमध्ये त्यांनी श्रीमती आर एस बी आर्या विद्या मंदिर (जुहू) संघाला ३-१ ने पराभूत केले.
हा सामना विंग्स स्पोर्ट्स सेंटर, बांद्रा (पश्चिम) येथे झाला. अनाई डिसोझा, जहान मिस्त्री आणि वीर केडिया यांनी कॅथेड्रलसाठी गोल केले, तर एव्हीएम संघाकडून पृथ्वीराज तानपुरे याने एकमेव गोल केला.
फायनलला भारतीय फुटबॉलपटू आणि सध्या डायमंड हार्बर एफसी (कोलकाता) संघाकडून खेळणारे राजू गायकवाड आणि महाराष्ट्राचे संतोष ट्रॉफी प्रतिनिधी तसेच सध्या स्पोर्ट्स – इन्कम टॅक्सचे जनरल सेक्रेटरी नील डिकोस्टा उपस्थित होते. राजू गायकवाड म्हणाले, “ड्रीम स्पोर्ट्स आणि एमएसएसएच्या सहकार्याबद्दल अभिनंदन. या स्पर्धेत उत्तम मैदानं, चांगली सोय-सुविधा मिळत आहे. हे तरुण खेळाडूंना खूप प्रेरणा देतं. सर्व मुलं-मुलींनी मेहनत घ्या, फुटबॉलचा आनंद घ्या आणि लक्षात ठेवा, शिस्त ही खेळात महत्त्वाची असते.”
बॉईज अंडर १६ डिव्हिजन १ तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात डॉन बॉस्को (माटुंगा) संघाने डॉन बॉस्को (बोरीवली) संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-४ ने पराभूत केले. पूर्ण वेळ २-२ अशी बरोबरी झाली होती.
गर्ल्स अंडर १६ डिव्हिजन १ सेमीफायनलमध्ये कॅथेड्रल अँड जॉन कॉनन (फोर्ट) संघाने बॉम्बे स्कॉटिश (पोवई) संघाला पेनल्टीत ४-३ ने पराभूत केले. सामना पूर्ण वेळ ०-० अशा बरोबरीत संपला होता. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये जामनाबाई नर्सी (जुहू) संघाने श्रीमती आर एस बी एव्हीएम (जुहू) संघाला पेनल्टीत ३-२ ने पराभूत केले. हा सामना पूर्ण वेळ १-१ असा झाला होता.
बॉईज अंडर १६ डिव्हिजन २ मध्ये एसव्हीकेएम (विले पार्ले) संघाने सेंट फ्रान्सिस डी’असिसी (बोरीवली) संघाला २-१ ने पराभूत केले.