< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); खेळ व हालचाल मानवी जीवनाची मुलभूत प्रेरणा : डॉ भुजबळ – Sport Splus

खेळ व हालचाल मानवी जीवनाची मुलभूत प्रेरणा : डॉ भुजबळ

  • By admin
  • August 14, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, वाघिरे महाविद्यालय सासवड येथे प्राचार्य डॉ पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी यांच्यासाठी टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे रसायनशास्त्र विषयातील संशोधक व टेबल टेनिस खेळाडू डॉ एन एन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ एन एन भुजबळ यांनी, “प्रत्येक व्यक्तीने जीवन जगताना खेळाला वेळ देणे गरजेचे आहे. खेळ व हालचाल ही मानवी जीवनाची मूलभूत प्रेरणा आहे असे मत व्यक्त केले.

“कार्यालयीन कामकाजासोबत इतर कला व क्रीडा गुण प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी जपावे, रोजच्या व्यस्त कामातून त्यांना विरंगुळा मिळावा, म्हणून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ पंडित शेळके यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी लेफ्टनंट गजेंद्र आहिवळे, अशोक कोंढावळे, प्रा सचिन कुमार शहा, प्रा उल्हास लंगोटे, डॉ ए बी निंबाळकर, प्रा विजय घारे, प्रा हरीश भुतकर, रवी जाधव, शैलेश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा प्रीतम ओव्हाळ यांनी केले. पंच म्हणून प्रथमेश जगताप, सिद्धांत जगताप व श्रेयस जगताप यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *