
विजेतेपदासाठी एकूण ३०२ खेळाडूंमध्ये चुरस
छत्रपती संभाजीनगर: शतरंज रायझिंग स्टार आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने छत्रपती संभाजीनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या राज्य सब ज्युनिअर अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला आहे.

बीड बायपास मार्गावर असलेल्या वासंती मंगल कार्यालय या ठिकाणी राज्य बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मराठवाडा लीगल आणि जनरल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर, ॲड. सुधीर पाटील, सिद्धिविनायक व्हेंचरचे सचिन मालानी, वासंती हॉलचे संचालक शिवाजीराव घोले पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव हेमेंद्र पटेल, फिटे आर्बिटर प्रवीण ठाकरे, स्पर्धेच्या प्रमुख रेफ्री आंतरराष्ट्रीय पंच दीप्ती शिदोरे, स्पर्धेच्या संचालिका महिला आंतरराष्ट्रीय मास्टर तेजस्विनी सागर, सिया सागर, अंजली सागर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मुलांच्या वयोगटात एकूण १९७ तर मुलींच्या गटात एकूण १०५ खेळाडू सहभागी झालेले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकित १४० खेळाडू सहभागी झालेले आहेत. स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातील एकूण ३०२ आपला सहभाग नोंदवला आहे.

ही स्पर्धा या एकूण स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यांमध्ये वासंती मंगल कार्यालय येथे होत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत छत्रपती संभाजी नगरच्या आर्णव धनंजय तोतला (१५४४) याने सांगलीच्या आपल्यापेक्षा जास्त मानांकन असलेल्या आदित्य चव्हाण (१८२१) यांस बरोबरीत रोखले. तसेच पुण्याच्या वरद दिनेश गायकवाड (१५३६)याने नागपूरचा मारस सहजवीर सिंग (१७७१) यांस बरोबरीत रोखले. अर्णव अमित शेडगे सांगली (१५२५) याने पुण्याचा राम लतिक यांस बरोबरीत रोखले.
स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर प्रथम फिडे मानांकित नागपूरचा शौनक बडोले, मुंबईचा राम विशाल परब, पुण्याचा शाश्वत गुप्ता, सिद्धांत साळुंखे, भुवान शितोळे, चंद्रपूरचा निहान पोहने हे तीन गुणांसह आघाडीवर आहे. अथर्व सोनी यास तिसऱ्या फेरीत अहिल्यानगरच्या जिनम संकलेचा याने दुसऱ्या पटावर बरोबरीत रोखले. तर मुलींमध्ये प्रथम मानांकित सांगलीची श्रेया हिप्परगी, पुण्याची निहीरा कौल, सई पाटील, सई देव,नागपूरची हृतिका गमे, श्रद्धा बजाज, नांदेडची ओवी पवार, छत्रपती संभाजी नगरची भूमिका वागळे हे तीन गुणांसह आघाडीवर आहे.

या स्पर्धेत पंच म्हणून आंतरराष्ट्रीय दिप्ती शिदोरे, सहाय्यक पंच विलास राजपूत, प्रवीण जोशी, अजय पटेल, मिथुन वाघमारे, संकेत यादव, सतीश ठाकूर, शुभांगी कुलकर्णी हे काम बघत आहेत.