छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व स्विमिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महा गेम्स अंतर्गत जिल्हास्तरीय वयोगट जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेत अंडर ८, १०, १२, १४ व अंडर १७ या वयोगटाखालील खेळाडूंचा (मुले व मुली) समावेश आहे. महानगरपालिकेच्या महागेम्स या अंतर्गत स्पर्धेचे आयोजन होत आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे क्रीडा व्यासपीठ प्राप्त होऊन खेळाबद्दल प्रोत्साहन व जनजागृती निर्माण व्हावी हा या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा महानगरपालिकेच्या सिद्धार्थ जलतरण तलाव येथे १७ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उद्यान अधीक्षक विजय पाटील व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व प्रशिक्षक, पालक, क्रीडाप्रेमी यांनी स्पर्धेत सहभागी होऊन उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Swiming freestyle under 17 girls
Swimming game, under 17 girls, freestyle
Swimming game under 17 girls freestyle and back strok