
मुंबई : दादर (पूर्व) येथील शिवनेरी सेवा मंडळाने भारतीय स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शिवनेरी रोड रेस स्पर्धेत पंकज महातो, आरुषी गुप्ता, इशांत शर्मा, डिनेल अल्मेडा, अनिकेत सोनार, देवश्री पाटील, श्लोक मोंडकर, आरती यादवने अनुक्रमे १६, १४, १२, १० वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून त्या-त्या गटाचे विजेतेपद मिळविले.

शिवनेरी सेवा मंडळाने दरवर्षी प्रमाणे लहान मुला-मुलींसाठी रोड रेसचे आयोजन करून भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला. १०,१२, १४ व १६ वर्षाखालील मुला-मुलींसाठी घेण्यात आलेल्या या रोड रेस मध्ये ५०० पेक्षा जास्त धावपटूंचा सहभाग लाभला. रोड रेसचे आकर्षण असणाऱ्या १६ वर्षाखालील मुलांच्या गटात पंकज महातो व मुलींच्या गटात आरुषी गुप्ता यांनी पहिला क्रमांक मिळवला.

या रोड रेसच्या वेळी रवी करमरकर, फ्रॅंक अल्फान्सो, सुधाकर राऊळ हे क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दादर येथील स्पिकवेल या इंग्रजी संभाषण शिकविणाऱ्या नामांकित संस्थेचे प्रमुख सचिन मांजरेकर, शिवसेना उपविभाग प्रमुख नितीन पेडणेकर यांनी या रोड रेसला आर्थिक सहाय्य केले. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांक मिळवऱ्या धावपटूंना आकर्षक चषक, प्रमाणपत्र, रोख रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आले.
विविध गटातील प्रथम तीन क्रमांक मिळवणारे धावपटू
१६ वर्षाखालील मुले ः प्रथम – पंकज महातो, द्वितीय – रितिक डांगी, तृतीय – प्रियांशु रजक. १६ वर्षाखालील मुली ः प्रथम – आरुषी गुप्ता, द्वितीय – मुस्कान शेख, तृतीय – त्रिशा गुप्ता.
१४ वर्षाखालील मुले ः प्रथम – इशांत शर्मा, द्वितीय – प्रेम पंडीत, तृतीय – क्षितिज केणी. १४ वर्षाखालील मुली ः प्रथम – डिनेल अल्मेडा, द्वितीय – झरना बिक, तृतीय – गार्गी काडगे.
१२ वर्षाखालील मुले ः प्रथम – अनिकेत सोनार, द्वितीय – श्रीकांत पवार, तृतीय – सिधांश सावंत. १२ वर्षाखालील मुली ः प्रथम – देवश्री पाटील, द्वितीय – शौर्या मयेकर,तृतीय – अवनी मोरे.
१० वर्षाखालील मुले ः प्रथम – श्लोक मोंडकर, द्वितीय – सत्यम गुप्ता, तृतीय – श्रेयश ताम्हणकर. १० वर्षाखालील मुली ः प्रथम – आरती यादव, द्वितीय – निक्षिका बरमेरा,
तृतीय- शौर्या ताम्हणकर.