रामराव विद्यामंदिर हायस्कूलच्या सम्राट, समरची निवड

  • By admin
  • August 18, 2025
  • 0
  • 104 Views
Spread the love

सांगली ः मराठा मंदिर संचलित श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या (ता जत, जि सांगली) दोन खेळाडूंची अकलूज येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सम्राट नितीन तोर्वे व समर विनोद शिवशरण या दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत शाळेचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मराठा मंदिर संस्था, प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्याकडून दोघांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

शाळेतील क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश साध्य झाले असून भविष्यातही हे विद्यार्थी अजून मोठ्या पातळीवर शाळेचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे, मुंबई विभाग संपर्क प्रमुख तथा जिल्हा अध्यक्ष ठाणे प्रमोद वाघमोडे यांच्यातर्फे दोन्ही विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *