इंडियन कॅडेट फोर्सतर्फे गिर्यारोहण शिबीर उत्साहात संपन्न 

  • By admin
  • August 18, 2025
  • 0
  • 29 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : इंडियन कॅडेट फोर्सतर्फे तसेच जायंट्स ग्रुप ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवारी ३४ वे गिर्यारोहण शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

या शिबिराचे आयोजन आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथून ट्रेकिंगची सुरुवात झाली. उद्घाटन प्रसंगी डॉ रवींद्र झंवर तसेच नंदू पटेल उपस्थित होते. या शिबिराचे नेतृत्व जगदीश खैरनार यांनी केले.

या उपक्रमामध्ये सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गिर्यारोहण दरम्यान पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती देण्यात आली. तसेच विविध झाडांच्या बिया चालताना पेरण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी जवळपास १५ किलोमीटर ट्रेकिंग पूर्ण केले. H2O वॉटर पार्क समोरील चंद्रकोरी मार्गे खाली उतरत, शेवटी लोटस हॉटेल (श्री भारुका) येथे शिबिराचा समारोप झाला. या ठिकाणी आयसीएफ तर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सर्व विद्यार्थी सुखरूप घरी परतले.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन कॅडेट फोर्सचे बाळासाहेब राठोड, किशोर नावकर, बबलू त्रिवेदी, प्रभूलाल पटेल, प्रवीण जैस्वाल, निलेश लकडे, शोएब पठाण, सुरज सुलाने, भरत मार्कड, प्रदीप शेंडगे, पंकज वाडेकर,  विजय पाटील, दिपाली वाडेकर, आम्रपाली मार्कड, छाया राठोड तसेच इतर आयसीएफ कॅडेट यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *