फार्मसी कॉलेजतर्फे माइंडसेट मॅटर्स सेमिनार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

  • By admin
  • August 19, 2025
  • 0
  • 73 Views
Spread the love

पुणे ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या फार्मसी कॉलेज हडपसरतर्फे माइंडसेट मॅटर्स या विषयावर प्रेरणादायी सेमिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कर्नल सतपाल चंदगोत्रा, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी व मोटिवेशनल स्पीकर आणि सुप्रसिद्ध गायक गुराशीश सिंग या मान्यवरांचा सहभाग होता.

कार्यक्रमाची सुरुवात प्रा श्रद्धा चितळे यांनी मान्यवरांचे स्वागत करून केली. तसेच सरस्वती पूजनानंतर प्राचार्य डॉ आर वाय पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ आर वाय पाटील यांनी दोन्ही वक्त्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांना जीवनात सकारात्मकता आणि चिकाटी ठेवण्याचा संदेश दिला. प्रा सोनाली वाघ यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.

कर्नल सतपाल चंदगोत्रा यांनी सैन्य सेवेतून घेतलेल्या अनुभवांवर आधारित शिस्त, मानसिक तग धरण्याची क्षमता व सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना धैर्याने आव्हानांचा सामना करण्याचा आणि प्रगतीशील विचारसरणी अंगीकारण्याचा सल्ला दिला.

गुराशीश सिंग यांनी आपल्या गायनाने तसेच संगीत क्षेत्रातील जिद्द, मेहनत आणि संघर्षाची कहाणी सांगून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या गाण्यांनी व विचारांनी “मन:स्थितीच माणसाचे भाग्य घडवते” हा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.

प्रा दीपांजली नागवडे यांनी आभार प्रदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वय प्रा देवयानी किर्वे आणि डॉ अभिषेक पवार यांनी उत्कृष्टपणे पार पाडले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा, प्राध्यापकांचा आणि उपस्थित पाहुण्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थित सर्वांच्या मनात प्रेरणादायी ठसा उमटवणारा हा सेमिनार यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *