
पुणे ः क्रीडा भारती पुणे महानगरतर्फे २४ ऑगस्ट रोजी डॉक्टर हेडगेवार चषक दहावी खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा पुणे जिल्हा चेस सर्कलच्या मान्यतेने बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी खुला गट तसेच दहा व चौदा वर्षांखालील खेळाडू असे विभाग ठेवण्यात आले आहेत.
या स्पर्धेसाठी २५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेतील खुल्या गटाकरिता ५ हजार रुपये, ३५०० रूपये व २ हजार रुपये अशी पहिली तीन पारितोषिक ठेवण्यात आली असून दहाव्या क्रमांकापर्यंत रोख पारितोषिक दिले जाणार आहेत. दहा व चौदा वर्षांखालील गटासाठी एक हजार रुपये व सुवर्णपदक, सातशे रुपये व रौप्यपदक, पाचशे रुपये व कांस्यपदक अशी पहिली तीन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या विभागाकरिता सातशे रुपयांचे पहिले पारितोषिक ठेवण्यात आले असून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी चारशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल. महिला विभागाकरिता सातशे रुपये, पाचशे रुपये व तीनशे रुपये अशी पहिली तीन पारितोषिके दिली जाणार आहेत बिगरमानांकीत खेळाडूंसाठी सातशे रुपये व पाचशे रुपये अशी पहिली दोन पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तीन ते पाच क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी तीनशे रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
या स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी जयंत गोखले (९०११०१३०५५) व दीप्ती शिदोरे (९६०४७३७१८३) यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन क्रीडा भारतीचे विजय रजपूत आणि विनायक बापट यांनी केले आहे.