
भांडुप, मुंबई (प्रेम पंडित) ः काठमांडू, नेपाळ येथे पार पडलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भांडुपचा सुपुत्र अक्षय मुरलीधर कारंडे याने भारताचे प्रतिनिधित्व करत चौथा क्रमांक पटकवून देशाचे व भांडुपचे नाव मोठे केले आहे.
अक्षयच्या या अभिमानास्पद कामगिरी बाबत त्याचे कौतुक होत आहे. लवकरच श्रीलंका येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पिशनशिपमध्ये अक्षय कारंडे हा देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याबद्दल अक्षयला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.