
मुंबई ः पुणे येथील न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नव्या क्लस्टर स्पर्धेत नवीन पनवेल येथील डीएव्ही स्कूलच्या तन्मय भगत, नीव चंदे, सारंग कदम यांनी बॅडमिंटन स्पर्धेत शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदके पटकावली.
तन्मय भगत याने एकेरी स्पर्धा जिंकली. तर नीव चंदे आणि सारंग कदमने दुहेरीत बाजी मारली. तायक्वांदो स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात ४८ किलोमध्ये आणि ६३ किलो वजनी गटात अनुक्रमे याच शाळेच्या अर्थव कुरानगले, तनिष भुजबळने कांस्य पदकाची कमाई केली. तर कोल्हापूर येथे झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत डीएव्ही स्कूलच्या ओजस कदमने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळवले.
सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची निवड पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, पुणे, बंगळुरू आणि तिरुअनंतपुरम येथील सीबीएसई शाळांनी सहभाग घेतला होता. पदक विजेत्या खेळाडूंना नितीन पाटील (बॅडमिंटन), अरुण पाटील (अॅथलेटिक्स) आणि तायक्वांदोसाठी समीक्षा कायंदेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शाळेचे प्रिन्सिपल सुमंत घोष यांनी सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे खास अभिनंदन केले आहे.