
सन हेल्थ क्लबतर्फे जिल्हा बेंच प्रेस स्पर्धेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः सन हेल्थ क्लबतर्फे दिवंगत जस्सी भाटिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा बेंच प्रेस स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित केली होती. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतून २५ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेप्रसंगी फिटनेस जगताशी संबंधित खेळाडू आणि पाहुण्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाला पाठिंबा दिला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर त्रिंबक भाऊ, डॉ पवन डोंगरे, डॉ सुनील पाटील, पुनप्रीत सिंह सत्याल, रवींद्र सिंह सत्याल आणि अमरदीप सिंह गिल हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि आयोजकांना कौतुकास्पद सहकार्य केले. या कार्यक्रमात त्रिंबक तुपे यांचे विशेष योगदान होते.
या स्पर्धेत १३० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता आणि त्यापैकी २५ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेचे नियोजन जीतू जस्सी भाटिया आणि जॉयदीप सिंह सत्याल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. तसेच त्यांच्यासोबत सौरभ कलोले, वैभव थोरात, अमृतपाल सिंग संधू, निर्भय वर्मा आणि स्वप्नील हरमकर यांनी विशेष सहकार्य केले.