
नांदेड ः नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशन नांदेड यांच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल, अनिकेत नगर, नांदेड येथे दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत जिल्हा सेपक टकरॉ संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणी स्पर्धेत सब ज्युनियर, ज्युनियर गटातील मुले व मुली सहभाग नोंदवू शकतात.
या निवड चाचणीत स्पर्धेत निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र सेपक टकरॉ असोसिएशन व नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत नांदेड येथे आयोजित होणाऱ्या २५ वी सब ज्युनियर आणि २६ वी ज्युनियर राज्यस्तरीय सेपक टकरॉ स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
या निवड चाचणीत स्पर्धेत सहभाग नोंदविणारा खेळाडू हा नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशनचा नोंदणीकृत खेळाडू असावा. खेळाडूंनी निवड चाचणीच्या वेळी जन्म दाखला पुरावा, आधार कार्ड, यूआरएन रजिस्ट्रेशन आय कार्ड व दोन फोटो सोबत आणावेत. या निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन नांदेड जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशनचे सचिव प्रवीण कुपटीकर, रवीकुमार बकवाड यांनी केले आहे.