
दहीहंडी महोत्सवात शहरातील खेळाडूंना प्राईड ऑफ सिटी पुरस्कार प्रदान
छत्रपती संभाजीनगर : सूर वाद्याच्या तालावर गोविंदा पथकाचे उत्कंठा वाढविणारे एकावर एक थर…पाहणाऱ्या प्रत्येकाचे डोळे दीपावणारे प्रत्येक क्षण…आणि उंचावर असलेल्या दहीहंडीला स्वाभिमानी मानाची सलामी यंदा शहरातील तब्बल ४१ गोविंदा पथकांनी दिमाखदार सोहळ्यात कॅनॉट प्लेस येथे दिली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने सिडको कॅनॉट प्लेस येथे स्वाभिमान दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, संस्थापक सचिव विशाल दाभाडे, अध्यक्ष समीर लोखंडे, कार्याध्यक्ष अमर ठाकूर यांनी गोविंदा पथक तसेच शहरातील लोकप्रतिनिधींचे स्वागत केले.
मल्लखांब या खेळाचे पितामह पद्मश्री उदय देशपांडे, कबड्डी या खेळात पहिला छत्रपती पुरस्कार विजेत्या श्रीमती चित्रा नाबर- केरकर यांच्या उपस्थितीत “प्राईड ऑफ सिटी” हा पुरस्कार देऊन स्वाभिमान क्रीडा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय केणेकर, आमदार संजना जाधव, महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमाहापौर राजू शिंदे, विजय औताडे, पोलिस अधीक्षक डॉ. विनय राठोड यांनी आलेल्या गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या
सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरणाचा समतोल राखत यावर्षी दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला. असून शहरातील सर्वप्रथम मनाची दहीहंडी गोविंदा पथकाच्या सहभागाने सलामी देऊन फोडण्यात आली. दुपारी दोन वाजता या महोत्सवाला प्रारंभ होणार झाला. गोविंदा पथक दरवर्षी या दहीहंडीला सर्वप्रथम सहभागी होतात व नंतर इतर ठिकाणी जात असतात. मागील वर्षी ४० हून अधिक गोविंदा पथकाने या स्वाभिमान दहीहंडी महोत्सवात आपला सहभाग नोंदविला होता. यंदा गोविंदा पथकाचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष डॉ प्रमोद राठोड यांनी दिली.
स्वाभिमान दहीहंडी महोत्सव गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात येत असून यंदाही हा महोत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. असल्याचा विश्वास यावेळी डॉ प्रमोद राठोड यांनी बोलताना व्यक्त केला. दहीहंडी महोत्सवादारम्यान महिलांसाठी विशेष आसनव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती तर प्रथोमोपंचारासाठी विशेष आरोग्य पथकाचे नियोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात विविध राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय खेळाडू यांनी आपली हजेरी लावल्याने यंदाच्या स्वाभिमान दहीहंडी महोत्सवाचे विशेष आणि खास आकर्षण ठरले असे स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, संस्थापक सचिव विशाल दाभाडे, दहीहंडी अध्यक्ष समीर लोखंडे, प्रदीप राठोड, कार्याध्यक्ष अमर ठाकूर, उपाध्यक्ष अभिजित खरात, नितेश टेकाळे, सचिव विक्रांत पंजाबी कार्यकारिणी सदस्य सिराज कुरेशी, जीवन रौदळ, गिरीश बांगर, गोरख राठोड, अमान पटेल, रऊफ पठाण, विशाल काकडे, आशिष मार्गे, राहुल उगमुगले, अक्षय जगदाळे, रुपेश देवणकर, हरीश देशमुख, राहुल तुपे, हर्षवर्धन पाटील, क्रीडा विभाग प्रमुख पंकज परदेशी, आकाश टाके, प्रसाद महाजन, विजय मोरे, राहुल शिंदे ,दिनेश जायभाये, अक्षय तुपे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांनी स्पष्ट केले.