
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे शहर विभागीय क्रीडा समितीची वर्ष २०२५-२६ ची पहिली सर्वसाधारण सभा पूना कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, कॅम्प, पुणे येथे संपन्न झाली. या सभेत वर्ष २०२५-२६ साठी पुणे शहर विभागीय क्रीडा समितीचे यजमानपद पूना कॉलेजला देण्यात आले तसेच कार्यकारिणी समितीची घोषणा करण्यात आली.

या सभेत पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ इक्बाल एन शेख यांची अध्यक्षपदी तर पूना कॉलेजचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ अय्याझ हुसैन शेख यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

स्थायी समिती पुणे शहरातील महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे नियोजन व आयोजन करणार आहे. सभेत उपस्थित मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला की डॉ इक्बाल शेख व डॉ अय्याझ शेख यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील क्रीडा क्षेत्र अधिक प्रभावीपणे विकसित होईल.
आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांसाठी सप्टेंबर महिन्यातील पहिल्या दहा क्रीडा प्रकारांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या स्पर्धा नियोजित तारखेनुसार पार पडतील.
स्थायी समिती (२०२५-२६)
अध्यक्ष – प्राचार्य डॉ इक्बाल एन शेख, सचिव – डॉ अय्याझ हुसैन शेख (पूना कॉलेज), सहसचिव – डॉ मोहन अमृळे (बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय), डॉ आशा बंगळे (आबासाहेब गरवारे महाविद्यालय), प्रा अनिरुद्ध शर्मा (सिंबायोसिस महाविद्यालय), कोषाध्यक्ष – डॉ उमेश बिबवे (गरवरे कॉलेज ऑफ कॉमर्स, सदस्य – क्रीडा मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ). सदस्य ः डॉ अनघा चिकटे (सिद्धिविनायक महाविद्यालय), डॉ शांताराम ढमाले (आप्पासाहेब जेधे कॉलेज), डॉ दीपक शेंडकर (मॉडर्न कॉलेज, गणेश खिंड), डॉ शिरीष मोरे (चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालय), डॉ मनीषा कोंढरे (आयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय), प्रा अभिजीत परसे (संस्कार मंदिर महाविद्यालय), डॉ अभिजीत कदम (पदवीत्तर जिमखाना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रा मिथुन त्रिभुवन (नेस वाडिया कॉलेज).