
मुंबई (प्रेम पंडित) ः मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि युनिव्हर्सल बुद्धिबळ फाउंडेशनतर्फे २३ ऑगस्ट रोजी एमएसडीसीए जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ओपन गटात होणार आहे.
ही बुद्धिबळ स्पर्धा फक्त मुंबई उपनगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आहे. म्हणजेच वांद्रे ते दहिसर, चुनाभट्टी ते मानखुर्द आणि कुर्ला ते मुलुंड या भागातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. ही स्पर्धा राम मंदिर वैष्णव ट्रस्ट हॉल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, जोगेश्वरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०६० या ठिकाणी होणार आहे. शनिवारी सकाळी ९.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा स्विस लीग सिस्टीम अंतर्गत फिडे नियमानुसार होणार आहे. अधिक माहितीसाठी विठ्ठल माधव (८४५२८४०००९) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.