
मुंबई (प्रेम पंडित) ः मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि युनिव्हर्सल चेस फाउंडेशन यांच्यातर्फे २४ ऑगस्ट रोजी पहिली अॅक्विनास इंटरनॅशनल स्कूल बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
अॅक्विनास इंटरनॅशनल स्कूल, कार्डिनल ग्रॅसियास नगर, महात्मा गांधी रोड, रोझरी चर्चसमोर, टिळक नगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००६२ या ठिकाणी ही बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा वर्ग ८, १०, १२, १४, १६ अशी होईल. मुले व मुली हे स्वतंत्रपणे खेळणार आहेत. पहिली ते दहावी मुलांच्या गटासाठी प्रत्येक वर्गासाठी करंडक दिला जाईल. पहिली ते पाचवी मुलींच्या गटासाठी करंडक देण्यात येणार आहे. प्रवेश शुल्क ६०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी विश्वनाथ माधव (9820121241) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.