चंद्रपाल दंडिमे यांना क्रीडा पितामह पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर ः पांडे बंधू यांच्या मिरा प्रभाकर पांडे स्पोर्ट्स पार्क (एमपीपी स्पोर्ट्स पार्क) द्वारा आयोजित बॅडमिंटन हॉलचा उद्घाटन सोहळा आणि क्रीडा पितामह पुरस्कार २०२५ सोहळा २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
यावर्षी निवड समितीने श्री चंद्रपाल दंडीमे यांना यावर्षीचा क्रीडा पितामह पुरस्कार देण्याचे ठरले आहे. हा पुरस्कार वितरण कार्यक्रम मंगळवारी (२६ ऑगस्ट) संध्याकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या हस्ते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त जी श्रीकांत हे राहणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रदीप जैस्वाल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम मीरा प्रभाकर पांडे स्पोर्ट्स पार्क, वानखेडे नगर या ठिकाणी मंगळवारी संऑध्याकाळी साडेसहा वाजता होणार आहे, अशी कार्यक्रमास क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ॲड गोपाल पांडे, डॉ मकरंद जोशी, सतीश यादव, विनायक (गणू) पांडे, ॲड संकर्षण जोशी, रुद्राक्ष पांडे यांनी दिली.