डीएफसी श्रावणी, पूरब जैस्वाल इलेव्हनचे दणदणीत विजय 

  • By admin
  • August 23, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

डी ११ टी २० लीग ः इशांत राय, सुशील आरक सामनावीर, मंगेश निटूरकरची आक्रमक अर्धशतक  

छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यांमध्ये डीएफसी श्रावणी संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा पाच विकेट राखून पराभव केला. दुसरा सामना गोलंदाजांनी गाजवला. कमी धावसंख्येचा हा सामना पूरब जैस्वाल संघाने सहा विकेट राखून जिंकला.  या लढतींमध्ये इशांत राय आणि सुशील आरक या गोलंदाजांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला. 

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. व्हिजन क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २० षटकात सर्वबाद १४४ धावसंख्या उभारली. डीएफसी श्रावणी संघाने हे आव्हान यशस्वीपणे पेलत १७.१ षटकात पाच बाद १४५ धावा फटकावत पाच विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या लढतीत इशांत राय हा सामनावीर ठरला. 

या सामन्यात फलंदाजीत मंगेश निटूरकर याने दमदार फलंदाजी केली. मंगेश निटूरकर याने ४८ चेंडूत ५९ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी साकारली. या अर्धशतकात त्याने सात चौकार व एक षटकार मारला. सुरज गोंड याने सहा चौकारांसह ३५ चेंडूत ४२ धावा काढल्या तर विजय जाधवने २४ चेंडूत ३९ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत इशांत राय (३-२०), अनिल जाधव (२-१४) व निलेश गवई (२-२३) यांनी प्रभावी मारा करत विकेट घेतल्या. 

पूरब जैस्वाल संघाचा मोठा विजय

दुसरा सामना पूरब जैस्वाल संघाने अवघ्या ६.३ षटकात आणि सहा विकेट राखून जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय एमई क्रिकेट अकादमी संघाला महागात पडला. पूरब जैस्वाल संघाच्य घातक गोलंदाजीसमोर एमई अकादमी संघ १५ षटकात अवघ्या ६१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर पूरब जैस्वाल याने ६.३ षटकात चार बाद ६२ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात किरण लहाने (१८), फय्याज पठाण (१३), तौफिक शेख (१२) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत सुशील आरक (३-७), सुफियान अहमद (२-९) व अनुराग कचरे (२-८) यांनी प्रभावी गोलंदाजी करत विकेट घेतल्या. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *