नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘संगम २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध विषयांवर कार्यशाळा संपन्न. यावेळी राज्याच्या माजी मुख्यसचिव सुजाता सौनिक, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सार्थक गौरव, प्र-कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे वरिष्ठ सहकारी आणि माजी ग्रुप एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट व चीफ इकॅानॅामिस्ट डॉ अजित रानडे यांनी ‘इकॅानॅामिक पस्पेक्टिव ऑफ द हेल्थ सेक्टर’ या विषयावर मार्गदर्शन करतांनी सांगितले की, आरोग्य सेवा ही फक्त उपचार आणि काळजीपुरती मर्यादित नाही, तर ती एक मोठी आर्थिक उलाढाल असणारी इंडस्ट्री आहे. यामध्ये दवाखाने, औषध कंपन्या, वैद्यकीय उपकरणे आणि आरोग्य विमा कंपन्यांचा समावेश आहे. आरोग्य क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रोजगार र्निमिती होते आणि देशाच्या एकूणच अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. असुरक्षितता, कमी बचत आणि कमी उत्पन्न यामुळे लोक आरोग्य विम्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत. पण, आरोग्य विमा हा आग किवा अपघाताच्या विम्यासारखा नाही. आरोग्य सेवा ही एक ’सोशल अरेंजमेंट’ आहे. जिथे प्रत्येकजण विमा भरतो आणि गरज पडल्यास काही लोकांना त्याचा लाभ होतो. यामुळे प्रत्येकाला आर्थिक संरक्षण मिळते असे त्यांनी सांगितले.
डिजिटल आरोग्य सेवा
यावेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे वरिष्ठ सहकारी आणि माजी ग्रुप एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट व चीफ इकॅानॅामिस्ट डॉ कार्तिक आडप्पा यांनी स्ट्रेथिंग डिजिटल हेल्थ या विषयावर मार्गदर्शन करतांनी सांगितले की, आजच्या जगात डिजिटल तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. डिजिटल आरोग्य सेवा म्हणजे आरोग्य सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. यामुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ, जलद आणि प्रभावी बनली आहे. डिजिटल आरोग्य सेवांमुळे अनेक समस्यांवर मात करता येते. दुर्गम भागांमध्ये जिथे तज्ज्ञ डॉक्टर पोहोचू शकत नाहीत, तिथे टेलिमेडिसिनच्या माध्यमातून आरोग्य सल्ला देणे शक्य झाले आहे. डिजिटल आरोग्य सेवा हे आरोग्य क्षेत्राचे भविष्य आहे. डजिटल आरोग्य सेवांना बळकटी देणे हे केवळ तंत्रज्ञानाचा वापर करणे नाही, तर प्रत्येकासाठी चांगले आरोग्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हेल्थ टेक्नॉलॉजी असेसमेंट ऑड हेल्थ इकॅानॅामिक्स या विषयावर पॅनल डिस्कशन झाले. यामध्ये डॉ सोनाली किरडे, डॉ बिना जोशी, डॉ सुब्रमण्यम महाकाली, प्रा नारायणा प्रसाद यांनी सहभाग घेतला.
तंत्रज्ञानाचा उपयोग
यावेळी वॉशिंग्टन येथील ग्लोबल हेल्थ युनिव्हर्सिटीचे डॉ सुभाष हिरा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन हेल्थकेअर अॅण्ड पब्लिक हेल्थ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात आलो आहोत. एआय हे मानवासारखे विचार करणारे, शिकणारे आणि निर्णय घेणारे तंत्रज्ञान आहे. आता आपण हे तंत्रज्ञान आरोग्य सेवा आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये वापरायला हवे. एआयचा वापर धोकादायक किवा मानवांसाठी शक्य नसलेल्या कामांसाठी केला जातो. नवीन औषधांचा शोधः एआयमुळे नवीन औषधे आणि लसींचा शोध खूप वेगाने लागतो. सार्वजनिक आरोग्याची माहितीः मृत्यू, अपंगत्व आणि इतर रोगांची माहिती गोळा करण्यासाठी एआय मदत करते. एआयमुळे वैज्ञानिक लेख आणि संशोधनासाठी आवश्यक माहिती सहज उपलब्ध होते. लायब्ररीत जाऊन संदर्भ शोधण्याऐवजी, एआय काही सेकंदात हे काम करते. कृत्रिम बुध्दिमत्ता ही आपल्या जीवनात एक मोठी क्रांती घडवून आणत आहे. आरोग्य सेवांमध्ये याचा वापर खूप फायदेशीर ठरु शकतो. त्याचा योग्य वापर कसा करायचा, यावर लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्पना प्रत्यक्षात उतरणे आवश्यक
यावेळी पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ संजय झोडपे यांनी इनोवेशन इन पब्लिक हेल्थ या विषयावर मार्गदर्शन करतांनी सांगितले की, कोणत्याही धोरणाची अंमलबजावणी करताना, त्याचा लाभ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचायला हवा. सार्वजनिक आरोग्यामध्ये यशस्वी होण्यासाठी, केवळ नवीन कल्पना असणे पुरेसे नसून त्या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक गरजूंना त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी कठोर परिश्रम आणि नाविन्यपूर्ण विचारसरणीची गरज आहे. सार्वजनिक आरोग्यातील नाविन्य म्हणजे केवळ नवीन तंत्रज्ञान नाही, तर ते सामाजिक न्यायावर आधारित एक व्यापक दृष्टिकोन आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. टेलिमेडिसिन (दूरचिकित्सा) या तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील लोकांनाही तज्ज्ञ डॅाक्टरांचा सल्ला घेणे शक्य झाले आहे. याशिवाय, मोबाइल एॅप्लिकेशन्स आणि आरोग्यविषयक वेबसाईट~समुळे लोकांना आपल्या आरोग्याबद्दलची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. यामुळे लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे सोपे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिरिऑट्रिक अॅण्ड पॅलेटिव्ह हेल्थकेअर सोल्युशन या विषयावर राउंड टेबल डिस्कशन झाले. यामध्ये डॉ राकेश गर्ग, डॉ सुरेश कुमार, डॉ विवेक अग्रवाल, डॉ मंगला बोरकर, डॉ वर्षा फडके यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि सेंटर फॅार हेल्थ ऑप्लाइड नॅालेज ऑड रिसर्च ऑटोनॉमी यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी राज्याच्या माजी मुख्यसचिव सुजाता सौनिक, विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ संजय झोडपे, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी ब्रिगेडियर सुबोध मुळगुंद उपस्थित होते.



