
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन वर्ल्ड स्कूल या संघाने राज्य रग्बी स्पर्धेत शानदार कामगिरी बजावली. या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात या शाळेच्या मुलींच्या संघाने परभणी व कोल्हापूर या संघांविरुद्ध चुरशीची लढत दिली.
श्री छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी पुणे येथे १७ वी राज्यस्तरीय ज्युनियर रग्बी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर आणि परभणी यांच्यात पहिल्या फेरीत सामना झाला. हा सामना अतिशय चुरशीचा झाला. दुसऱ्या फेरीत कोल्हापूर संघाविरुद्ध डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन वर्ल्ड स्कूलच्या मुलींच्या संघाने चांगली कामगिरी केली.
या संघासोबत विवेक उकर्डे, संगीता खोसरे हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी सुनील सूर्यवंशी, सृष्टी सुरेंद्र चौधरी, गुंजन प्रमोद शेजुळ, अनुष्का जयंत सूर्यवंशी, उन्नती विजय ताते, दिव्यांशी सोमनाथ यज्ञसेनी, हिरतीका संजीव सिंग या खेळाडूंनी शानदार खेळ केला. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन वर्ल्ड स्कूलच्या संस्था चालक वर्षा रमेश उकर्डे तसेच सर्व शिक्षकांनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.