राज्य अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी बाभुळगावच्या १० खेळाडूंची निवड

  • By admin
  • August 25, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय निवड चाचणी अॅथलेटिक्स स्पर्धेत बाभुळगावच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत जिल्हा संघात आपले नाव निश्चित केले आहे.

पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बाभुळगावच्या जयहिंद विद्यालयाच्या अमृता तुपे (प्रथम), धनश्री गुजराणे (प्रथम), शारदा राऊत (द्वितीय), गायत्री जाधव (तृतीय) यांनी १४ वर्षांखालील गटात आपल्या प्रकारांत घवघवीत यश संपादन केले.

१६ वर्षांखालील गटात जयश्री नरोडे (प्रथम), कल्याणी तुपे (प्रथम), प्रिया गुमलाडू (द्वितीय), आरुषी तुपे (प्रथम), साक्षी ढगे (तृतीय), रेवती तुपे (प्रथम), पल्लवी तुपे (तृतीय) या खेळाडूंनी आपापल्या प्रकारांत घवघवीत यश मिळवले.

२० वर्षांखालील गटात साक्षी तुपे (प्रथम), अमृता गायकवाड (प्रथम) यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात वर्चस्व गाजवत प्रथम क्रमांक मिळवला. या कामगिरीामुळे प्रथम व द्वितीय क्रमांक संपादन करणाऱया खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघात निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक असोसिएशनतर्फे २ ते ५ सप्टेंबर दरम्यान शिव छत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे राज्यस्तरीय कनिष्टगट मैदानी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघात बाभुळगावच्या १० खेळाडूंची निवड झाली आहे.

या यशस्वी खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव डॉ फुलचंद सलामपुरे, पंकज भारसाखळे, डॉ दयानंद कांबळे, सतीश पाटील, तुषार खेडकर आदींनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *