
डेरवण ः एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील एकूण २७५ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, क्रीडा शिक्षक सोमनाथ सुरवसे, माणिक पाटील, मनीष काणेकर, उल्हास मोहिते, आशिष कानापडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात खेळाडूंना दर्जेदार मैदान, आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण लक्ष फक्त खेळावर केंद्रित करता आले. अशा सोयी – सुविधा मिळाल्यास खेळाडूंची कामगिरी आपोआप उंचावेल. ग्रामीण भागातही जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होत आहेत ही आनंदाची बाब आहे. या माध्यमातूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे क्रीडा शिक्षक सोमनाथ सुरवसे यांनी मत व्यक्त केले.
स्पर्धेचा अंतिम निकाल (अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक)
१४ वर्षाखालील मुले – तनिष्क जितेंद्र महाडीक, निशांत अभिजीत जाधव, विजय रमेश पुजारी. ज्योतिर्मय दीपक हिवरे, हमजा खलपे.
१४ वर्षांखालील मुली – मनस्वी निलेश सुर्वे, श्रीपर्णी राकेश चाळके, पृथ्वी संतोष माने, श्रुती संदेश पवार, आर्या विपुल उतेकर.
१७ वर्षांखालील मुले – सात्विक राजेश जाधव, आरुष सुधीर पवार, तन्मय विकास कवळकर, देवेश मंगेश कोलगे, पार्थ आत्माराम कांबळे.
१७ वर्षांखालील मुली – भूशरा साबिर कापडी, समृद्धी शांताराम मोभारकर, जान्हवी रघुनाथ गोताड, तेजस्वी सुहास पवार, वेदा प्रशांत खार्डे.
१९ वर्षाखालील मुले – ओंकार सतीश दहिवलकर, संहिल समीर हेलेकर, वेदांत श्रीराम लांबे, पार्थ प्रमोद माने, मुसा मैनुद्दीन खलपे.
१९ वर्षांखालील मुली – तन्वी सुभाष पकडे, अनुष्का विनोद कदम, आदिती नीलेश साळवी, सणीक टणजी कुळये, श्रेया मंगेश फणसे.